जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण

0
43

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 28- जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने आज, दि. २८ नोव्हेंबर, २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. NSDL (Protean) कार्यालयात सहाय्यक प्रबंधक या पदावर कार्यरत असणारे सुर्यकांत तरे यांनी उपस्थित सर्वांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्यालय, ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील निवृत्तीवेतन योजना संदर्भांतील कामकाज हाताळणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यावरील जमा रक्कमेतून गुंतवणूक करण्याबाबत विविध पर्यांय, अंशतः रक्कम आहारीत करणे, सेवा निवृत्ती वेतन योजनेचे विविध पर्याय, कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याचे कुटुंब निवृत्ती वेतन, राजीनामा, रुग्णतः निवृत्ती वेतन या सर्व योजनेबाबत सखोल मार्गदर्शन सुर्यकांत तरे यांनी केले.
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ची योग्य पद्ध तीने अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तसेच अनेक शंकाबाबत अधिकारी-कर्मचारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here