इतिहास रचयिता थोर
क्रांतीसुर्य महात्मा ज्योति
शिक्षणाचा पाया रचिला
समाज सुधारक सत्यशोधक क्रांती
जातीव्यवस्था निर्मूलनासाठी
घातला पाया निर्भीडपणे
सावित्रीस शिकविले ज्ञानाचा
सागर महात्मा ज्योतिबा क्रांतीने
स्त्रीसाठी अन्यायाविरुद्ध लढले
जातीभेद निर्मूलनाची पेटविली मशाल
शिवरायांची समाधीशोधक
सामाजकार्य अन शिक्षण केले विशाल
गोविंदराव चिमणाबाईचे पुत्र
जन्मले 11 एप्रिल 1827 कटगुण
सातारा, विधवा विवाहाला दिले प्रोत्साहन
पहिल्या शाळेचे केले निरूपण
28 नोव्हेंबर 1890 ला
महात्मांची पुण्यतिथी करू साकार
घेऊ विचार त्या महान ज्योतींचे
देव त्यांच्या स्वप्नांना आकार
कवयित्री रंजना भैसारे
नागपूर

