जागतिक एड्स दिन 2024 निमित्त रॅलीद्वारे एड्स, एचआयव्हीबाबत जनजागृती

0
40

लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त लातूर शहरामध्ये 2 डिसेंबर, 2024 रोजी एचआयव्ही, एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून रॅलीला सुरुवात झाली.

विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एन. तांबारे, एआरटी नोडल ऑफिसर डॉ. चंद्रकांत रायभोगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. वर्षा कलशेटी तसेच आरोग्य विभाग व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य ‘टेक द राईट्स पाथ’चा नारा देवून जनजागरण रॅलीची सुरुवात झाली. मिनी मार्केट , हनुमान चौक, गुळ मार्केट, गांधी चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. यावेळी आयसीटसी 1 चे समुपादेशक राहूल दोशी यांनी आभार मानले.

रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी एचआयव्ही ससंर्ग टाळण्यासाठी युवक तरुणांमध्ये जबाबदार लैंगिक वर्तवूणक व सुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही संसर्गाचा प्रतिबंध, सर्व एचआयव्ही संसर्गितांना औषधोपचार, ट्रीट ऑल पॉलिसी, नवीन एचआयव्ही ससंर्ग होवू द्यायचा नाही. कलंक व भेदभाव होवू द्यायचा नाही. एड्सने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आणणे याबात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांना एड्सविरोधी शपथ देण्यात आली.

रॅलीमध्ये न्यू व्हिजन नर्सींग स्कुल, इंदिरा गांधी नर्सींग कॉलेज, शासकीय नर्सींग कॉलेज, वेदांत नर्सींग कॉलेज, महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सींग, जिजामाता नर्सींग स्कूल, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नर्सींग कॉलेज, अरमान नर्सींग कॉलेज, एमआयएमएस नर्सींग कॉलेज, स्वामी विवेकानंद नर्सींग कॉलेज, रेनसन्स नर्सींग कॉलेज, विजय नर्सींग कॉलेज, प्रयागबाई पाटील नर्सींग कॉलेज, सोनी नर्सींग कॉलेज, जवळगे नर्सींग कॉलेज, शारदा नर्सींग कॉलेज, लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा, टीआय प्रकल्प, विहान प्रकल्प, 108 एम.ई.एम.एस. टीएमसह रुग्णवाहिका तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दुरुगकर यांनी केले.

या रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा कार्यक्रम अधिकारी बिपीन बोर्डे, , जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व सर्व अधिकारी , कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here