आसाळा येथे दिनशॉ डेयरी दूध संकलन केंद्राचे उद्घाटन

0
47

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वरोरा तालुक्यातील आसाळा येथे दिनशॉ डेयरी, डी. ओ. सी. सी, एम. थ्री. एम. फाउंडेशन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आसाळा येथे दिनशॉ डेयरी दूध संकलन केंद्र चालू करण्यात आले.
दूध संकलन केंद्र उद्घाटन आसाळा येथे येथील आनंदराव देवगडे, शंकर आसुटकर, सुधाकर डुकरे, अनिल डुकरे, किशोर डुकरे , कार्यक्रम समन्वयक अधिकारी भूमेशकुमार तांडेकर, प्रकल्प समन्वयक अनिल पेंदाम, दिनशॉ डेयरी सुपरवायझर सपाटे, गावकरी उपस्थित होते.
आसाळा परिसरातील गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर दूध टाकले . हे दूध संकलन केंद्र प्रेरक म्हणून पूजा अंकुश देवगडे चालवणार आहे. सकाळ वेळात दूध संकलन केंद्र चालू राहील. यावेळी कार्यक्रम समन्वयक अधिकारी भूमेशकुमार तांडेकर यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरचे वैरण घालण्याकरिता बरशीम आणि नेपीयर गवत विषय मार्गदर्शन केले व उत्तम प्रजातीचे दुधाळू जनावर याचे नियोजन करून भरपूर प्रमाणत दुध मिळवता येईल आणि दिनशॉ डेयरी संकलन केंद्रावर मोठ्या प्रमाणात दूध आणण्याचे व दुध उत्पादक शेतकर्यांना आवाहन केले आहे.
आसाळा येथील दूध संकलन केंद्र चालू करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अगडते दिनशॉ डेयरी झोनल मॅनेजर दीपक ठवकर सर, , विकास डुकरे, करण आसुटकर, गौरव देवगड, अकुश देवगडे , अन्नजी देवगडे, अभिषेक देवगडे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here