सामाजिक बांधिलकी जोपासात माणूसकीचा हात देत मनोरुग्णची मदत करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन

0
104

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – 6 डिसेंबर 2024 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जात असताना माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन शास्त्री चौक येथे एक बुजुर्ग व्यक्ती 2 ते 3 दिवसापासून पेट्रोल पंप जवळ झोपून असल्याचे दिसले, तेव्हा मी व माझे सहकार्य मित्र यांनी पाहणी केली व काही सेवाभावी संस्था ना फोन लावून माहिती दिली,त्याच्याकडून अपेक्षित माहिती मिळाली,त्याना येण्यास वेळ लागत असल्याने 112 वर फोन लावून माहिती दिली, त्वरित तेव्हा पोलीस कर्मचारी धम्माभाऊ सेलकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन चोकशी केली ,कोणत्याही गोष्टी ची वाट न बघता ऑटो बोलून ऑटोमध्ये टाकून त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन जाऊन त्याचा त्वरित उपचार करण्यास सांगितले ,तेव्हा चेकप केल्यानंतर एक्सरे काढण्यास सांगितले व त्याची विचारपूस केल्यानंतर त्यानी सांगितले की पाय घसरून पडल्याने चलता येत नाही ,एक्सरे काढल्यानंतर फ्लक्चर असल्याचे डॉ साहेब यांनी सांगितले, त्यानंतर त्याना सरकारी दवाखान्यात भरती करून त्याचा नातेसंबंध याचा पोलीस कर्मचारी याच्या वतीने शोध घेण्यासाठी सांगितले ,व त्याना माहिती दिली व त्याना त्वरित। सरकारी दवाखान्यात पोहचण्यास सांगितले, तेव्हा त्याचे नातेवाईक पोहचल्या नंतर त्याच्या स्वाधीन करून दिले,तेव्हा त्याच्या नातेसंबंध यांनी आभार व्यक्त केले,तेव्हा पोलिस कर्मचारी धम्मा सेलकर सर, कमलेश बडे सर ,कमलेश उमरे,अंकुश भोयर, हरीश कळंबे बंटी रंगारी,यांनी सहकार्य केले बद्दल आत्मनिर्भर बहुउद्देशीय सामाजिक संस्था,वर्धा अध्यक्ष ,भिम आर्मी चे जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक्के सर्व लोकांचे आभार व्यक्त करून नेहमी सामाजिक सहकार्य संस्था ,संघटना करत असते,हीच आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन आहे असे त्यानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here