अटी व शर्तीच्या धसक्याने लाडक्या बहिणींना लागली सहाव्या हप्त्याचे हुरहुर

0
130

किनवट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा मैलाचा दगड ठरलेल्या व प्रचंड सुपरहिट ठरलेली योजना लाडकी बहीण या योजनेने महायुती सरकारला प्रचंड अभूतपूर्व यश मिळवून दिले असून या विजयामध्ये  मोठा वाटा असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांचाही मोठा वाटा असल्याचे राजकीय विश्लेषकांनी मान्य केले आहे. पण निवडणूक निकाल लागतात व फडणवीस सरकार स्थापन होताच  या योजनेच्या अटी व शर्थीमध्ये धक्कादायक बदल करण्याच्या चर्चेला सध्या ऊत आला आहे.

गदगांव (चिमूर) येथील अतिक्रमण हटविणे म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या भावनेचा अनादर….


त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या अनुदानाचे काय होईल? कसं होईल? अशी शंकेची पाल चूक-चुकत असून या विषयी चर्चेला उधान येत आहे आहे.
लाडक्या बहिणींना आतापर्यंत सात हजार पाचशे म्हणजेच पाच हप्ते मिळाले असून आता सहाव्या हफ्त्यापासून पेव फुटलेल्या अफवेनुसार काही बहिणींची नाव वगळणार असल्याने याचा मोठा धसका या बहिणींनी घेतला आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू केली व सदर योजनेचे नियोजनबद्ध ब्रॅण्डिंग करून महायुतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. आता या लाडक्या बहिणींनी पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली असून जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील तिसरा हप्ता काही दिवसाच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. दरम्यान आचारसंहिता सुरू होण्या अगोदर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीलाच खात्यात जमा केले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रेरणादायी संघर्षाची गाथा – आ. किशोर जोरगेवार


महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास या योजनेचे पैसे दीड हजार रुपयांवरून २१०० रुपये अशी चर्चा सुरू झाली. मात्र आता निकष तपासूनच लाडक्या बहिणींना अनुदानाचा लाभ मिळणार असून त्यामध्ये लाभार्थी महिलांचा पती आयकर भरतो का? कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? विधवा परित्यक्ता निराधार व अन्ययोजनेचा लाभ घेतला जातो आहे का? लाभार्थी महिलेचा पती शासकीय नोकरीत आहे काय अशा प्रकारचे अटी शर्ती लागणार असल्याच्या चर्चेंना लाडक्या बहिणीमध्ये उधान आलेले असून अटी शर्ती लागून लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळते की नाही याची हुरहुर लागलेली आहे.

5 डिसेंबर 1971 च्या युद्धात विजय मिळाल्याबद्दल कोल्हापूरमध्ये 53 वा थानपीर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here