“महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी ठरले मा. खंदारे सूर्यभान गुणाजी, किनवट नांदेड, तर “महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री” ठरल्या आहेत,मा. कु. दीपिका दिनेश क्षीरसागर (सौ.बऱ्हाणपुरे) मु. पो. धारणी, ता. धारणी (मेळघाट) जिल्हा अमरावती
सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय समूहात प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या महत्वपूर्ण विषयांवर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कवी आणि कवयित्री मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
“सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र. ११ ही दि. ९ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२४ या दरम्यान घेण्यात आली होती. महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा बुद्ध भूषण महापराक्रमी, धुरंधर राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “महाबली छत्रपती संभाजी महाराज” या विषयावर आठवडी काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील कवी, कवयित्रींनी बहुसंख्येने सहभाग नोंदवला होता. शिवछत्रपतींचा छावा राजे संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या व त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करणाऱ्या अतिशय सुंदर ह्रदयस्पर्शी रचना या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य होते.
या काव्यलेखन स्पर्धेत यावेळी
“महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” मा. खंदारे गुणाजी सूर्यभान, जलधारा ता. किनवट जि. नांदेड हे विजयी झाले आहेत. कवी बी. ए. डी.एड. असून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा “मातीच्या गर्भातून” हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांना अनेक साहित्य समूहाचे सकाळ सदर ‘पहाटवारा’ लेखनाचे तसेच काव्यलेखनाचे पुरस्कार व सन्मानपत्र प्राप्त झाले आहेत. ऋणानुबंध काव्यसमूहामार्फत “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय” या काव्याला २०००/-₹ प्रथम पारितोषिक लाभले. कवी निसर्गप्रेमी असून त्यांना वृक्षारोपण व सामाजिक कार्याची आवड आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री चा सन्मान कवयित्री मा. कु. दीपिका क्षीरसागर, ता. धारणी जिल्हा अमरावती यांना मिळाला आहे. त्यांनी अष्टाक्षरी काव्यप्रकारात छत्रपतींच्या गौरव गाथेवर काव्य रचले. कवयित्री एम. ए. मराठी असून जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वाचन, लेखन, अध्यापन आणि सामाजिक कार्याची आवड आहे. त्या कवितेचे बहुतांश प्रकार हाताळतात. अनेक आँनलाईन समूहात त्यांचे लिखाण सुरू असून सर्व श्रेणीतील सन्मानपत्र प्राप्त आहेत. आदिवासी समाजातील बालिकांना त्या शिक्षणासाठी प्रेरणा देत असतात.
दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सम्यक दर्शन साहित्य समूहाचे संस्थापक देविदास गायकवाड तसेच सौ.सुनिता तागवान हे आहेत तसेच सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.
या समूहात प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जातो. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

