prabodhini news logo
Home चंद्रपूर संविधानाच्या अपमानाचा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन

संविधानाच्या अपमानाचा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन

0
132

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंगळवारी (१० डिसेंबर) सायंकाळी घडली. घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली, मात्र संतप्त जमावाने पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना देखील घडल्या. घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

आजची कविता – चंद्रावरची शाळा


संविधानाच्या अपमानाविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ अभिवादन करून ‘जय भीम’ आणि ‘मनुवादी विचारसरणीचा निषेध’ अशा घोषणा दिल्या.

यावेळी काँग्रेसने संविधान प्रेमींवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आणि घटनाक्रमात सहभागी असलेल्या व्यक्तींवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, अश्विनी खोब्रागडे, अनुताई दहेगावकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष सागर खोब्रागडे, ओबीसी सेलचे राहुल चौधरी, किसान सेलचे भानचंद्र दानव यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

आजची कविता – चंद्रवरची शाळा


ही घटना संविधानाच्या अपमानाची असून यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here