prabodhini news logo
Home कविता आजची कविता – चंद्रावरची शाळा

आजची कविता – चंद्रावरची शाळा

0
218

निळ्या नभी भरते शाळा
निळी निळी माझी शाळा
पाखरे येतात शाळेत
लपून बसतात ढगात

रात्री चंद्र येतो आकाशात
मुले खेळतात चांदण्यात
कधी लपतो चंद्र ढगाआड
चंद्रावरील शाळा फार द्वाड

खूप करतो मस्ती नभात
धावतो पळतो ढगांमागे
चांदण्याचा सडा वेचतो
सुर्याला पाहून लपतो चंद्रामागे

आई नाही येत दंगामस्ती पहायला
चल घरात आधी म्हणून ओरडायला
मिळते येथे भरपूर खेळायला
चंद्रावर बसून घर शोधायला

परिक्षा आमची असते तेव्हा
झरझर झरझर पाऊस येतो
पेपर आमचे भिजवून टाकतो
आम्ही मग पावसात चिंब भिजतो ..

ही शाळा मज फार आवडते
पण आईची आठवण येते
मी पावसा सोबत खाली येतो
गच्च गच्च मिठी आईला मारतो

कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here