छान शाळा पाखरांची
चंद्रा वरती भरली
सारी दिसता रांगेत
आकाशात बसलेली….1
चिव चिव किलबिल
सगळ्यांची घोंगावती
येई साऱ्यांना शिकवी
राघू पोपट पाहती…..2
पावसात भरे शाळा
बंद नसते कधीच
उत्साहात सगळेच
येई हर्षात आधीच……3
खेळकर पणा जास्त
नकोच तोच अभ्यास
इकडून तिकडून
मस्ती करण्याचा ध्यास….4
यांच्या सारखी शाळा
पाहिली कुठेच नाही
रविवारी पण बघा
शाळा भरतांना पाही….5
सौ.वैजयंती विकास गहुकर
योगा टीचर व कवयित्री
जिल्हा.चंद्रपूर

