प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक 16 डिसेम्बर रोजी भिम आर्मी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांच्या नेतृत्वात शेकडो भिम आर्मी सैनिकांच्या उपस्थितीत परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, घटनेच्या मागील मुख्य सूत्रधाराचा तपास लावून त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच या घटनेत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारास 1 कोटीचा मोबदला, परिवारातील एकास सरकारी नौकरी, कारागृह निरीक्षक व चौकशी अधिकारी यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटला चालवावा या मुख्य मांगणी सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतड्या पासून पायी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
जिल्याध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांनी आक्रोश दर्शविताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला की विकृत व्यक्तीला काय केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची लिखित राज्यघटनाच कशी विटंबना करायचे समजते. जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात जाऊन एखाद्याला किंवा रस्त्यावरील वाटेसरुणा का बर मारायचे समजत नाही.
तसेच कोमिंग ऑपरेशन मध्ये भिम सैनिकांना बेदम मारताना व्हिडीओ वायरल होत असताना केवळ किरकोळ मारहाण केल्या गेली असे कसे काय म्हणू शकता कुठे या घटनेमागे आपल्या जवळच्याचाच तर हात नाही असा प्रश्न जणसामान्यापुढे निर्माण होत असेल तर वावगे काय?
सदर आक्रोश मोर्चात वंदनीय अनिरुद्ध भंतेजी, सुचितबोधी भंतेजी, जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद शेंडे, प्रमोद कातकर, सुरज उपरे, जिल्हासंघटक विशाखा आमटे, जिल्हासचिव संघप्रकाश ठमके, भद्रावती तालुका प्रमुख रतन पेटकर,बल्लारपूर शहर प्रमुख शशिकांत निरंजणे, उप प्रमुख बबलू करमरकर,अनिकेत रायपुरे, धम्मा उराडे, शुभम चिवंडे,सागर दुर्गे,रमाकांत मेश्राम, राजू गावंडे,अतुल पाटील,सूर्याभाई,गणेश पेंदोर, मिलिंद रामटेके,संकेत चिमुरकर,प्रणित तोडे,भीमराव आमटे, छोटीताई रायपुरे,पौर्णिमा रामटेके, छबीता धोटे, रेखा धोटे, सुनीता जोंधडे, चंद्रप्रभा रामटेके, कोमल रामटेके,कोमल गावंडे,शुभांगी कांबळे,दुर्गे ताई, विदया पराते, स्वरूपा ताई,भागेश्री पवार, उपासक ढोक, सोनू सिग, मंगेश पवार, अमोल चालखुरे सोबत शेकडो भिम आर्मीचे सैनिक उपस्थित होते. विशेष उपस्थिती मा. ऍड रवींद्र मोटघरे सर, मा. ऍड राजेश वनकर, मा. खुशाल तेलंग, मा. डॉ. राकेश गावतुरे, कोमल खोब्रागडे सर यांनी दर्शविली.सर्वांचे विशेष आभार मानीत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सोपवून मोर्च्याची सांगता करण्यात आली.

