बालनाट्य स्पर्धेला तिन्ही जिल्ह्यांतून नऊ संघाचा सहभाग
सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर- चंद्रपूर:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभाग नागपूर चंद्रपूर गट कार्यालयांतर्गत ललित कला भवन ,बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे गटस्तरिय बालनाट्य स्पर्धा दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी मा. रविराज ईळवे कल्याण आयुक्त,मुंबई व मा.नंदलाल राठोड उपकल्याण आयुक्त नागपूर मुंबई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न झाली.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्पर्धेचे परीक्षक मा. सागर मुने, मा.चैताली कटलावार, मा.जगदीश नंदुरकर व कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर हरिश्चंद्र अळणे व मा. भुवनेश्वरी धर्मपुरीवार शिक्षिका महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गडचांदूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.आनंदराव अडबाले अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय देवराव कोंडेकर, गुणवंत कामगार तथा अशासकीय सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती चंद्रपूर हे होते.
बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट बालनाट्य प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र गडचिरोली ,द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र हिंगणघाट ,तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र वर्धा तसेच उत्कृष्ट अभिनय मुलांमध्ये प्रथम सात्विक शिंदे ,द्वितीय प्रथमेश वाघमारे ,तृतीय पियुष डंबारे ,उत्कृष्ट अभिनय मुलींमध्ये प्रथम नंदिनी गुंडेवार, द्वितीय ईश्वरी झाडे, तृतीय रिया म्हैस्कर तसेच उत्कृष्ट दिग्दर्शनमध्ये प्रथम सुनीता सूर्यवंशी ,द्वितीय प्रतीक सूर्यवंशी, तृतीय संदीप उरकडे यांनी बक्षीस पटकावले.
या स्पर्धेला तिन्ही जिल्ह्यांमधून नऊ संघ सहभागी झाले होते.पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी चंद्रपूर यांनी तर सूत्रसंचालन व आभार किरण उपरे यांनी मानले.

