जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आवाहन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १९ : औसा तालुक्यातील गुबाळ, नांदुर्गा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राकडे चौकशी करण्यात आली आहे. त्यानुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.
औसा तालुक्यातील गुबाळ, नांदुर्गा परिसरात भूकंपाची नोंद झालेली नाही. तसेच औशाचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या परिसरात कोणतेही नुकसान झालेले नाही. भूकंपाची नोंद नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.

