बाबूपेठमध्ये दहशत माजवणारा मनोरुग्ण सिटी पोलिसांच्या ताब्यात

0
119

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर आज 20 डिसेंबर 2024 आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या सतर्कतेमुळे आणि पुढाकारातून बाबूपेठ परिसरात दहशत निर्माण करणारा एक अज्ञात मनोरुग्ण (अंदाजे 30-32 वर्ष) स्थानिक युवकांनी पकडून सिटी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

बाबूपेठ परिसरात काही दिवसांपासून एका 30-32 वयोगटातील मनोरुग्णाने नागरिकांमध्ये दहशत पसरवली होती. हा मनोरुग्ण महिलांवर, विशेषतः शाळकरी मुलींवर पाळत ठेऊन अचानक हल्ला करत होता. हातात दांडके घेऊन अश्लील शिवीगाळ करणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती आप पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ रामनगर पोलिस स्टेशनला माहिती दिली. मात्र, सदर व्यक्ती रोड क्रॉस करून सिटी पोलिस स्टेशन हद्दीत गेल्यामुळे रामनगर पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजू कुडे यांनी वॉर्डातील तरुणांच्या मदतीने त्या मनोरुग्णाला पकडले आणि सिटी पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला सदर व्यक्तीची ओळख पटत असेल तर त्यांनी सिटी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.

या प्रसंगी राजू कुडे यांनी भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सिटी पोलिस स्टेशनच्या पी. आय. प्रभावती एकुरके मॅडम यांचे आभार मानले.

हा प्रकार पोलिस आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निकाली निघाला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here