उदा. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले…!
विवेक मिरलवार तालुका प्रतिनिधि, अहेरी – अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा येथे जय जितम ग्रुपतर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट सामन्याचे उद्घाटन माजी जि. पी.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी हे होते.
त्यावेळी क्रिकेट आज अनेक तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहे, हा खेळ प्रत्येक खेळाडूचा आनंद द्विगुणित करू शकतो. या खेळाची प्रादेशिक स्तरावर वेगळी ओळख आहे, मात्र स्पर्धात्मक खेळ जिंकण्यासाठी खेळाडूंनी परिश्रम घेणे गरजेचे आहे, असे मत अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी व्यक्त केले, तरी प्रत्येक खेळाडूला शारीरिक व भावनिकदृष्ट्या प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून काँग्रेस अहेरी विधानसभा मतदार सघ.
क्रिकेट स्पर्धेत काँग्रेसचे नेते व माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी यांना प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. तसेच द्वितीय पारितोषिक शिवराम पुल्लुरी, अभिनखान पठाण, अर्शद अय्युब, तृतीय पारितोषिक जय जितन ग्रुप देत आहे. या स्पर्धेसाठी अशी तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.त्यावेळी अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांचे समुहातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम माता सरस्वती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बिरसा मुंडा यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी अहरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, गडचिरोली जि. प.माजी सदस्य अजय नैताम, माजी सभापती सुरेखा आलाम, माजी उपसरपंच अशोक येलमुले, शिवराम पुल्लुरी, प्रमोद गोडसेलवार यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

