ग्रामपंचायत ऊर्जानगर तर्फे वसाहती मधील ORC ग्राऊंड येथे ओपन जिम उद्घाटन समारंभ

0
54

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – आज दिनांक 20/12/2024 रोजी ऊर्जानगर ग्रामपंचायत तर्फे ऊर्जानगर वसाहती मधील ORC ग्राऊंड येथे ओपन जिम उद्घाटन समारंभ चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता मा. डॉ. भूषण शिंदे साहेब यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी मा. दिलीप वंजारी (कल्याण अधिकारी, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र), जयंत पारखी, आरीकर, धानोरकर, अंकित चिकटे (सरपंच, ग्रामपंचायत ऊर्जानगर), चौखंडे, ईरपाते, आवळे, गणा काका तसेच ग्रामपंचायत सदस्य मदन चीवंडे, अनुकूल खन्नाडे, उज्वला चौखंडे, सायली देठे आदी सदस्य उपस्थित होते.

ऊर्जानगर वसाहती मधील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी ओपन जिमचे व्यायाम साहित्य ORC ग्राऊंड येथे उपलब्ध केले आहे. तरी सन्माननीय नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here