प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचाराने निळा, पिवळा, लाल, पांढरा व केसरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ‘विश्व बौध्द धम्म ध्वजा’ची निर्मिती केली आहे. याला पाली भाषेत ‘षडरोशनी ध्वज’ किंवा ‘धम्म ध्वज’ असे म्हणतात. आज जगामध्ये धम्म ध्वज बौद्ध धर्माचे प्रतीक व म्हणून ओळखला जातो. परभणीच्या इंद्रायणीचा माळ या परिसरात निर्माण भव्य बौद्ध महाविहार परिसरात अखिल विश्वाला शांती, प्रगती, मानवतावाद, आणि समाज कल्याणाची सदैव प्रेरणा देणाऱ्या बौद्ध धम्म ध्वजाचे 50 फूट उंचीच्या भव्य धम्म ध्वजाचे ध्वजारोहण आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या ऐतिहासिक सोहळ्यास परभणी व परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित रहावे, आग्रहाचे निमंत्रण..!
उद्घाटक: भदंत फ्रा. पट्टरघुन कृदांग ,थायलंड प्रमुख उपस्थिती: आयु. गगन मलीक (सिने अभिनेता) डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, पूर्णा भदंत भदंत मुदितानंद थेरो भदंत मोगलायन , डॉ सिध्दार्थ दादा भालेराव गंगाखेड, कुणाल कांबळे सह संपादक दैनिक सम्राट
स्थळ: इंद्रायणीचा मळा मौजे मांडाखळी जिल्हा परभणी
दिनांक,8 जानेवारी 2025 वेळ: सकाळी ११.०० वा.
आयोजक : डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अध्यक्ष आश्रय सेवाभावी संस्था अध्यक्ष: महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभाग

