किनवट तालुका प्रतिनिधी अनिल बंगाळे – किनवट तालुक्यातील मौजे मोहपूर च्या भव्य यात्रेची सुरुवात दिनांक 30 डिसेंबर 2024 पासून होत असून या यात्रेची परंपरा जवळपास 30 वर्षापासूनची आहे आणि विशेष म्हणजे योगायोग असा आहे की, यावर्षी यात्रेची नेमकी सुरुवात पण तीस डिसेंबर 2024 ला होत आहे.मोहपूर येथील यात्रा म्हणजे बऱ्याच वर्षापासून नावारूपाला आलेली व पैनगंगेच्या तीराकाठी असलेल्या मोहपूर या ठिकाणी महादेवाच्या नावाने ही यात्रा भरते.तर यात्रेला सुरुवात करण्याकामी त्यामध्ये गावातील काही विशेष लोकांच्या अथक परिश्रमामुळे महादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि मोहपूर च्या यात्रेचा जन्म झाला म्हणजे ती यात्रा उदयास आली. तो त्यांच्या सहकार्याने अशा थोर व्यक्ती म्हणजे कै. धोंडबाजी मुकाडे महाराज, कै.मुंजाजी सोनटक्के पाटील, कै.गोविंदा सरकुंडे, कै.आत्माराम सोनटक्के, कै. माधव हजारे, कै.वसंतराव सोनटक्के पाटील, कै.गणपत आमले,कै.नामदेव खुडे, कै. कानबाजी सरकुंडे, कै. भागोराव खामकर, कै. विठ्ठल बेले, कै. दगडू चारोळे महाराज, कै.भिमराव खामकर, कै.गजानन सोनटक्के, कै. रामराव खुडे, कै.भिकाजी डाखोरे, श्री गोविंदा बैथिंगे या महान व दानशूर व्यक्तींनी सर्वप्रथम पुढाकार घेतल्यामुळे खरी यात्रेची सुरुवात झाली. खरंच या व्यक्तींची धन्यता मांनली पाहिजे आणि आज मोहपूर या गावाचं नाव यात्रेमुळे सर्व दूर पसरले आहे.
मोहपूर येथील यात्रा सतत बारा दिवस चालते. दिनांक 30 12. 2024 ते 12.01.2025 पर्यंत असते. तर त्यामध्ये अजून पुन्हा दुसरा योगायोग असा आला की, तो विशेष म्हणजे बारा दिवस चालणारी यात्रा ही नेमकी 12 जानेवारीलाच सांगता व समाप्त होते हे विशेष होय.
यात्रेमध्ये गावातील यात्रा कमिटी व कार्यकारी मंडळ यांनी चक्री मटका व जुगार या गोष्टीला परवानगी नाकारली आहे, त्यामुळे खरंच यात्रेच्या निमित्ताने सर्वप्रथम संपूर्ण गावकरी मंडळ व कार्यकारी मंडळ यांचं खूप खूप अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.
सदर यात्रेचे अध्यक्ष सुजित सोनटक्के, उपाध्यक्ष शिवदास खुडे, सचिव दिगंगाबर खुडे, सचिव विजय सोनटक्के, सहसचिव संतोष सोनटक्के, कोषाध्यक्ष प्रभाकर दर्शनवाड, सहकोषाध्यक्ष संजय खराटे, नागोराव भुरके, कार्याध्यक्ष मारुती खुडे, सहकार्याध्यक्ष राजू खुडे हे सर्व मंडळी विशेष पदाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
मोहपूर येथील यात्रेमध्ये अनेक विविध खेळ व स्पर्धेचे आयोजन खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. त्यामध्ये दिनांक 02.01.2025 रांगोळी स्पर्धा,03.01 2025 कबडी, 05.01. 2025 कबड्डीचे फायनल, 06.01. 2025 माठ फोडणे स्पर्धा, 07.01 2025 स्लो मोटरसायकल,08.01 2025 धावण्याची स्पर्धा, 09.01. 2025 हॉलीबॉल स्पर्धा, 10.01.2025 हॉलीबॉल फायनल, 11.01 2025 भव्य कुस्त्यांची दंगल, 11.01.2025 शंकरपट सुरुवात,12.01.2025 रोजी शंकर पटाचे फायनल होणार. तर अशा प्रकारे यात्रेतील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आलेली आहे.
अशा तऱ्हेने मोहपूर येथील यात्रेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्याच्या वतीने करण्यात आले असून याचा लाभ महाराष्ट्रसह नांदेड जिल्ह्यातील सर्व यात्रा प्रेमींनी घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने सर्वांना करण्यात आले असून खेळाचे बक्षीस सुद्धा आकर्षक असे आहेत.
कबडी या खेळाचे प्रथम बक्षीस 21000 हजार रुपये हे एडवोकेट प्रतीक भाऊ भीमराव केराम यांच्या तर्फे आहे. कबडी या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांचे हस्ते होणार आहे. कुस्तीचा पहिला इनाम 6000 रुपये कै. धोंडबाजी रणमले यांच्याकडून असून, कुस्ती स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय आमदार भीमराव केराम साहेब यांचे शुभहस्ते होईल. तर जंगी शंकर पट बक्षीस प्रथम 21000 हजार रुपये हे श्री नागेश पाटील आष्टीकर साहेब खासदार हिंगोली यांच्यातर्फे आहे. हॉलीबॉलचे प्रथम बक्षीस 5000 हजार रुपये हे दीपक सातव उपसरपंच मोहपूर यांच्याकडून ठेवण्यात आले आहे, स्लो मोटरसायकल पहिले बक्षीस 3000 हजार रुपये चि. शिवशंकर डॉ. बालाजी खुडे तर्फे, रांगोळी स्पर्धा गट-अ 1111 रुपये कु. नवयानी व श्री शरदचंद्र मानकरी गुरुजी उदगीर तर्फे ,रांगोळी गट ब 601 रुपये चि. सोहम सुधाकर राऊत तर्फे, धावण्याची स्पर्धा प्रथम बक्षीस 1001 रुपये चि.सुप्रभात दीपक भिसे तर्फे, यात्रेतील सर्वच खेळ व प्रथम बक्षीस वरील प्रमाणे दानशूर व्यक्तीकडून ठेवून यात्रेची शोभा वाढवण्यावर सखोल असा भर देऊन यात्रेचा नावलौकिक मिळविला आहे. तसेच प्लॉट वाटप कमिटीमध्ये सुधाकर सोनटक्के, तानाजी खामकर, अंकुश सोनटक्के, शंकर खामकर,विजय खुडे, अंकुश इंगळे, कैलास भिसे, किरण गवळी, गजानन खामकर ,हे पदाधिकारी प्लॉट वाटप करतील.
मोहपूर येथील यात्रेत जवळपास लाखो नव्हे तर करोडो रुपयांच्या बक्षिसाचे वाटप विजेत्या संघाला आणि विजेत्या व्यक्तीला मान सन्मानाने प्रदान केले जाते. या यात्रेची सुरुवात गेल्या 30 वर्षांपूर्वी करण्यात आली .ही यात्रा म्हणजे किनवट तालुक्यातील मोहपूरच्या परिसरातील अनेक गावासाठी विलोभनीय एक सुखद आनंद व खास मनोरंजनाची मेजवानीच समजायला काही हरकत नाही. यात्रेच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटी व अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याचा मोह कुणालाही आवरत नाही.तसेच यात्रेतील अनेक मनोरंजक खेळाचा मनसोक्त आनंद घेतला जातो.
एकेकाळी काही वर्षांपूर्वी यात्रे शिवाय दुसरे कोणतेच मनोरंजनाचे साधन नव्हते, परंतु आजच्या नेटवर्क म्हणजे मोबाईल युगात यात्रेची जागा मोबाईलने घेतली त्यामुळे काही प्रमाणात यात्रा कमी झाल्याचे जाणवते, तरी पण आज यात्रा म्हणजे मोठा आनंद वाटतो. यात्रेत पूर्वी सिनेमा म्हणजे पिक्चर बघण्याची हवस खूप लोकांना भरपूर प्रमाणात होती. तर आता मोबाईल मुळे त्याचं महत्व कमी झाल्याचे जाणवते. तसेच कोणत्याही ठिकाणी यात्रेचे आयोजन करणे हे कार्य वाटते तेवढे कदापि शक्य नसतं,कारण त्यासाठी आर्थिक मदत, गावकऱ्यांचे सहकारय,कामाचे नियोजन, एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणे व अशा अनेक विषयावर सखोल विचारांअंती निर्णय हा सर्वांच्या सहकार्याने अपेक्षित असतं. ते सर्व या गोष्टीवर मात करून मोहपूरकरांनी हे यश संपादन करून यात्रेला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यात्रेचे आयोजन हे फार पूर्वीपासून केलं जात आहे. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणच्या काही यात्रा खूप प्रसिद्ध आहेत, विशेषता लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा ही फार प्रसिद्ध आहे एवढेच नव्हे तर माळेगावची यात्रा म्हणजे एक प्रकारे दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाते. तर यात्रेच आयोजन करणे खूप चांगला उद्देश आहे कारण त्या ठिकाणी कुटुंबासह, मित्रमंडळीसह वेगळा आनंद पहावयास मिळतो.
अशा प्रकारे किनवट तालुक्यातील मोहपुर या ठिकाणी गावकऱ्यांच्या सहभागातून दरवर्षी यात्रेचे आयोजन मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध केलं जाते व परिसरातील सर्व जनता यात्रेचा मनसोक्त आनंद घेत असतात. अशीच ही एक नाव रूपाला आलेली मोहपूर येथील यात्रा होय. सर्वांना ही यात्रा शुभदायी होवो व सर्वांचा आनंद द्विगुणीत होवो आणि सर्वयात्रा प्रेमी व यात्रेकरूना यात्रेनिमित्त व नवीन वर्षा निमित्त 2025 या नवीन वर्षाच्या लाख लाख नव्हे कोटी कोटी शुभेच्छा.

