सरले क्षण सरले ऋतू
वर्षे सरले सारे
इतिहासाची पाने रंगवत
जिवनचक्र फिरे
निरोप देण्या गतवर्षाला
भाव फुलांनी केली गर्दी
अवती भोवती पिंगा घालते
सुख दु:खाची मोठी यादी
निरोपाची वेळ अशी ही
क्षितीज रेषा हुरहुरली
गालावरती स्मित असुनही
मनी वेदन हालचाली
गतवर्षाला निरोप देता
ओलावली पापणी
नभ किनारी सुर्य मावळला
उरल्या आठवणी
कवयित्री वैशाली वागरे – भुक्तरे
पालीनगर नांदेड

