कु. सोनाली कोसे
नागभिड तालुका प्रतिनिधी
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई व मासिक वृत्तपत्र न्यायप्रभात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व गुणगौरव समारंभ २०२४ दिनांक २९/१२/२०२४ रोज रविवारला श्रीक्षेत्र आळंदी येथे मोठ्या उत्साहात पार पडला असता, त्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चेक या खेड्या गावातील युवा कवी/लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील सहभाग होता.
त्यांना उपरोक्त संस्थेच्या वतीने सलग वर्षभरातील सहभाग व त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून साहित्य कलेच्या सन्मानार्थ कार्यक्रमाध्यक्ष विश्वगुरू डॉ. मधुसूदन घाणेकर सर पुणे, संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. शिवाजी खैरे, सह संपादिका/ कोषाध्यक्ष ह.भ.प.सौ. अनुसया खैरे, प्रमुख अतिथी महंत ह.भ.प. प्रल्हाद सुपेकर महाराज नवी मुंबई, तसेच ह.भ.प. अलका झरेकर अहमदनगर यांच्या हस्ते अष्टपैलू काव्य लेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२४ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात महाराष्ट्रभरातील साहित्यिक उपस्थित होते यांच्या या पुरस्काराबद्दल उपस्थित मान्यवर, कवी, कवयित्री, नातेवाईक, गाववासीय, साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार या सर्वांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

