केसलवाडा येथे शेतकऱ्यांनी शेतीशाळेत गिरवले एकात्मिक शेती पद्धतीचे धडे

0
42

जयेंद्र चव्हाण भंडारा जिल्हा प्रतिनिधी 9665175674 – भंडारा – दिनांक 27-12-2024 रोजी मौजा केसलवाडा येथे अन्न व पोषण सुरक्षा अभियान 2024-25 कडधान्य रब्बी हरभरा प्रकल्प अंतर्गत हरभरा पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये सत्राची सुरुवात इतनी शक्ती हमे देना दाता,मन का विश्वास कमजोर होना ही प्रार्थना घेऊन करण्यात आली.त्यानंतर शेतकऱ्यांना एकात्मिक पीक व्यवस्थापन , माती परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिका यावरून खत व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हरभरा पिकावरील मररोग, मुळकुज,खोडकूज व हरभरा पिकावरील रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन बाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. ह्यावेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे व कृषी पर्यवेक्षक भूमेश नवखरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.ह्यावेळी शेतकऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद व सहकार्य लाभले.

कृषीसेवक रितेश किकराळे यांनी विविध कृषि विषयक योजनांची माहिती दिली. तसेच कार्यक्रमाची रूपरेषा विशद करून उपस्थितांचे आभार मानले व पुढील शेतीशाळा सत्राचे नियोजन करून समारोप करण्यात आला. उपस्थित शेतकऱ्यांनी सुध्दा कृषी विभागाचे आभार मानून प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here