वाहनांची कसून चौकशी…..
विवेक बा मिरालवार
तालुका प्रतिनिधी अहेरी
8830554583
नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात करायला सर्वांनाच आवडते. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करायचे असते. अनेक लोक आपल्या कुटुंबासह बाहेर फिरायला जातात तर काही जण घरीच नवीन वर्षाचे स्वागत करतात. हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेक जणांनी आधीच योग्य नियोजन केले आहे. म्युझिक आणि डान्सशिवाय कोणतीही पार्टी पूर्ण होत नाही. मात्र, डीजे वाजवण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र डीजे बंद करावा लागेल.
युवकांकडून आयोजित केलेल्या कार्यक्रम व पार्त्यांमध्ये दारूचा उपयोग होण्याची शक्यता असते. दारूपिल्यानंतर भांडणे होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे अशा भांडणतंट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभाग सज्ज झाला आहे. नवीन वर्षानिमित्आयोजित पार्त्यांचा सपाटा दुसऱ्या दिवशीही कायम राहते. दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अपघातांचे प्रमाण
वाढते. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दारू व पार्टी हे समीकरण बदलण्याची गरज आहे. यासाठी काही सामाजिक संस्था सरसावल्या आहेत.
ब्रेथ एनालायझर मशीन तयार
पोलिसांकडे ब्रेथ एनालायझर मशीन आहे. या मशीनच्या सहाय्याने दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. परिणामी, या दिवशी दारू पिऊन वाहन न चालवलेलेच बरे. नाही तर नवीन वर्षाच्या स्वागतालाच थेट पोलिस कोठडीत जावे लागेल..

