२०२४ हे वर्ष अनेकांसाठी स्मरणीय ठरले. या वर्षात घडलेल्या घटना मिळालेले यश आणि सोसलेल्या आव्हानांनी आपले जीवन समृद्ध केले.आता या वर्षाला निरोप देताना आपल्या मनात गोड आठवणी आणि काही अप्रिय प्रसंग यांचा मिलाफ आहे.
२०२४ वर्षाने आपल्याला अनेक शिकवणी दिल्या. काहींनी आपल्या करिअरमध्ये प्रगती केली,तर काहींनी आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन यशस्वीपणे मार्ग काढला.या वर्षात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवन अधिक सोपे झाले तर आरोग्य शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातही सकारात्मक बदल झाले.
काहींच्या आयुष्यात २०२४ आनंदाचे क्षण घेऊन आले जसे की लग्न नवी नोकरी शिक्षणात यश किंवा कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन.तर काहींसाठी हे वर्ष कठीण निर्णयांचे आणि संघर्षांचे होते.महामारी किंवा नैसर्गिक आपत्तींच्या काळात आपण सहकार्य आणि एकतेचे धडे घेतले.
२०२४ वर्षाने आपल्या नातेसंबंधांची जाणीव करून दिली.जवळच्या लोकांशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व आणि वेळेचे योग्य नियोजन करण्याचे महत्त्व आपण अनुभवले.या वर्षात आपण आपल्या चुकांमधून बरेच काही शिकलो आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न केले.
आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण तयार आहोत.२०२५ चे स्वागत करण्यापूर्वी आपण २०२४ मधील चांगल्या आठवणी मनात साठवून ठेवूया आणि चुका सुधारून पुढे जाण्याचा निर्धार करूया.नवे स्वप्न नवी उद्दिष्टे आणि नवी उमेद घेऊन पुढे जाताना २०२४ वर्षाला मनापासून निरोप देऊया….
सेंड
लेखिका संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका, नांदेड

