
31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – चंद्रपूर, दि. 01: मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2024 करिता शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत पाठविण्यात येणार आहे.
1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.
शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “नवीन संदेश” या सदरात “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका” या शीर्षाखाली व ‘what’s new’ या सदरात ‘late yashwantrao chavan state literature award 2024 rules book and application form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णता भरून आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात.
लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दि. 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पाठवावे. लेखक/प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठवितांना सदर बंद लिफाफ्यावर/ पाकिटांवर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार-2024 साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले.














