शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम – मुंबई :अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मुंबईकडून चालू 2024-25 या वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभरात शताब्दी महोत्सव साजरा केल्या जात असून, त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील सर्वच शाखांमार्फत सुरू असून, त्यानिमित्ताने नुकतेच मुंबई येथे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल येथे माटुंगा-माहिम मुंबई येथे सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते असलेले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
याप्रसंगी वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी मा. नंदकिशोर कव्हळकर यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून,प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या लोकप्रिय नवनिर्वाचित महिला आमदार सईताई डहाके यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला असता सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देवून बहुमताने मंजूर करीत,आमदार सईताई डहाके यांचे अभिनंदन केले.यावेळी उज्वल देशमुख, नंदकिशोर कव्हळकर इत्यादी उपस्थित होते.

