पोलिस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

0
45


रस्ता सुरक्षा अभियान- 2025

दिपाली पाटिल जिल्हा उप संपादक, चंद्रपूर – दि. 04 : राज्यात 01 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत 36 वा रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुशंगाने जिल्हयातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रस्ते अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी, निर्भयपणे रस्त्यावर प्रवास करता यावा, यासाठी 3 जानेवारी रोजी वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय, चंद्रपूर येथून रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यात रस्ते सुरक्षा – जीवन रक्षा हा संदेश देण्यात आला.

तसेच 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त सदर जनजागृती रॅलीमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, सायबर सुरक्षा व उपाययोजना, पोक्सो कायदा, नायलॉन मांजाचा वापर न करणेबाबतसुध्दा जनजागृती करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान व पोलिस स्थापना दिवस जनजागृती फेरीमध्ये पोलिस, शहरातील तरुण मुले, मुली व शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्व समजावून देण्यात आले. यात सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर आणि इतर शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी सहभाग घेतला. सदर रॅली वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर ते प्रियदर्शनी चौक आणि परत वाहतूक नियंत्रण शाखा येथे समारोप करण्यात आला.

यावेळी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे, परिविक्षाधीन उपअधिक्षक प्रमोद चौगुले यांनी हिरवी झेंडी दाखवून फेरीची सुरुवात केली. सदर प्रसंगी वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार पाटील, मोटार परिवहन निरीक्षक विशाल कसंबे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अमानुल अंसारी, अंशुल मुर्दिव, सुरज मुन व दंगा नियंत्रण पथक, वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस अंमलदार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here