शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटना जिल्हा कोल्हापूर
कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दि.3/1/2025 रोजी शिवतेज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरूनभाई शेख, राष्ट्रीय महासचिव योगेश दंदने यांचा मार्गदर्शनाखाली आज कोल्हापूर जिल्हा कार्यालय इथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ – १० मार्च, इ.स. १८९७) या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी गिरी गोसावी, उपजिल्हा अध्यक्ष संतोष तोडकर, उपजिल्हा अध्यक्ष अरविंद टेळे पाटील, सचिव दिलीप कोळी, कार्यलय प्रमुख सुनिल कांबळे, पत्रकार प्रदीप जाधव,सतेज तोडकर, महिला जिल्हा अध्यक्ष कविता कोंडेकर, महिला उपजिल्हा अध्यक्ष मीनाक्षी सोगरसाने, महिला शहर अधक्ष्य रेखा माने, जील्हासदय इंदुबाई साळे,ज्याती तोडकर, भारती नाशीपुडे,माधवी पाटील,आरती पाटील,कांचन आर्लेकर, शीतल गायकवाड, सविता स्वामी,रेवती वाडे,निर्मला साळोखे, आनंदी कल्कुटकी, प्रियंका कोरगावकर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

