prabodhini news logo
Home गडचिरोली संतांच्या भूमीत चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘महापूजा’ या महानाट्यास पुरस्कार

संतांच्या भूमीत चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘महापूजा’ या महानाट्यास पुरस्कार

0
68

झाडीपट्टीचा पुन्हा एकदा गौरव

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गडचिरोली : संत चोखामेळा, संत दामाजी, संत कान्होपात्रा आदी १४ संत ज्या जन्मभूमीने दिले,व पंढरपूरच्या विठूरायांची ज्या नगरीवर कृपादृष्टी आहे, त्या मंगळवेढा गावातील शब्दकळा साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट साहित्यस्पर्धा घेण्यात येते.व साहित्यिकांना त्यांच्या दर्जेदार साहित्यनिर्मीती साठी ‘शब्दकळा उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने’ पुरस्कृत करण्यात येते. व दहा विजेत्या साहित्यिकांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.शब्दकळा साहित्य संघाच्या स्पर्धेचे हे चोविसावे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी नाट्य वाड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘महापूजा’ या महानाट्याची ‘शब्दकळा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार – २०२४’ साठी निवड करण्यात आली.
दि.०५ जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे (मा.पालकमंत्री सोलापूर) व मा.आम. समाधान (दादा) अवताडे (वि.प.सदस्य पंढरपूर मंगळवेढा), व मा. दत्तात्रय सावंत(वि. प. सदस्य, पुणे) यांचे हस्ते प्रा.शिवाजीराव काळूंगे (संचालक धनश्री परिवार), शिवानंद पाटील (चेअरमन, दामाजी शुगर), डॉ. शिवाजी शिंदे (सहा.कुलसचिव, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर), डॉ. सुरेश शिंदे (ज्येष्ठ कवी), टि.एस.चव्हाण, डॉ.महादेव देशमुख, प्रा.दिलीप जाधव, हरिष बंडीवढार, मनोहर मुधोळकर, श्रीमंत लष्करे, प्रा.डॉ. वामनराव जाधव,ॲड. नंदकुमार पवार इ. ‌ साहित्यिक, व प्रा.डॉ. शशिकांत जाधव (स्पर्धा प्रमुख तथा साहित्यिक) यांच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यिकांना सन्मानित आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या ‘महापूजा अर्थात महासती सावित्री’ या नाटकाचे लेखनासाठी शब्दकळा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार -२०२४ या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, विजेते साहित्यिक व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
‘महापूजा’ हे संपूर्ण झाडीपट्टीत गाजलेले महानाट्य असून या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग सादर झालेले आहेत .

विशेष म्हणजे ‘महापूजा’ नाटकास यापूर्वी नागपूर येथील ‘साहित्य विहार’, व बोरगाव (जि. सांगली) येथील ‘आधार प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले असून यंदाचा तिसऱ्यांदा मिळालेला हा वाड्.मय पुरस्कार आहे. यामुळे संपूर्ण झाडीपट्टीची मान उंचावली आहे.

चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा. यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ. योगीराज नगराळे, प्रा.डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, रमेश निखारे, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here