घर-घर सविधान अभियानाला प्रत्यक्षात सुरुवात
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – वरोरा भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सविधान जागर या अभियानाला प्रत्यक्षात दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने सुरुवात झाली असून या अभियानाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा पासून प्रारंभ करण्यात आला प्रारंभ करतेवेळी माजी गटशिक्षणाधिकारी भाऊराव चिवंडे, दिव्यांग कल्याण संस्थेचे जिल्हाध्यक्ष आचार्य परमानंद तिराणिक, संस्थेच्या जेष्ठ सल्लागार तथा मुख्याध्यापिका कल्पना कडू,संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. प्रीती साव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.निरज आत्राम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ग्यानिवंत गेडाम, कीर्ती पांडे, जिल्हा सचिव प्रदीप कोहपरे, सदस्या रुक्मिणी तिराणिक व संस्थेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचे वितरण करण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य,समता, न्याय व बंधुता या संविधानिक मूल्यांचा जागराविषयी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांचे महत्त्व पटवून सांगितल्या जात आहे.अभियानांतर्गत सर्व शाळेत विविध कार्यक्रम उपक्रमा मार्फत परमानंद तिराणिक यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले तुम्ही तुमच्या पालकांना सांगून संविधानाचा प्रत्येक घरापर्यंत व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत संविधानाचा जागर करावा व या मोहिमेत नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
50 पैशाच्या पोस्ट कार्डवर स्वहस्तलिखित ‘संविधानाची उद्देशिका ‘वितरण करताना ते कार्ड अनेकांनी न्याहाळून बघितले तर काही विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड कशाला म्हणतात हे त्यांनी जाणून घेतले मोबाईल व ‘ए आय ‘सारख्या संगणकाच्या युगात पोस्टकार्ड हे खरंच दुर्मिळ झाले आहे असा एकच सूर ऐकू आला. पोस्टकार्ड आता इतिहासात जमा झाले आहे याचा प्रत्यय यावेळी आला आहे. संविधानाबद्दल काही लोक हेतूपुरस्पर खोटी माहिती पसरवत आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांमधील गैरसमज दूर करून योग्य व वास्तव्य माहितीचे जागरण करणे हाच आमच्या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विविध शाळेत व महाविद्यालयात या उद्देशिकेचे वितरण करण्यात आले त्यात एक्सलेंट अकॅडमी ऑफ सायन्स वरोराचे संचालक प्राध्यापक अभय टोंगे,चेतना माध्यमिक विद्यालय, मजरा चे मुख्याध्यापक अरविंद ढवस,वनिता ढवस व सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीमध्ये तर आनंदवनातील आनंद माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे, सहा. शिक्षक प्रदीप कोहपरे,आशिष येटे,हर्षल चौधरी, स्मिता काळे, संचिता निबूद्धे, या सर्व शिक्षवृंदानी सहकार्य करून उपक्रमास प्रतिसाद दिला.

