डॉ. मिलिंद भगत यांचा ठराव सिनेट मध्ये सर्वानुमते मंजूर
अध्यासन केंद्राची विध्यापिठा मध्ये स्थापना होणार
दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – दिनांक ०८ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या गोंडवाना विध्यापिठाच्या अधिसभेमध्ये गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनचे सिनेट सदस्य डॉ. मिलिंद भगत यांनी स्मृ. बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त्य . बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्याचा ठराव अधिसभेसमोर मांडला होता व सर्व अधिसभा सदस्यांच्या एकमताने हा ठराव मंजूर झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर चे संस्थापक अध्यक्ष व समता, स्वातंत्र्य, न्यायाच्या फुले-शाहू-आंबेडकरी आंदोलनातील महान झुंझार नेते तथा राज्यसभेचे माजी उपसभापती स्मृतिशेष बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२५ ला गर्भश्रीमंत कुटुंबात झाला. सुरुवातीपासूनच सामाजिक चेतना असणारे हे खोबरागडे कुटुंब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात आल्यानंतर या कुटुंबाने बहुजन उद्धाराच्या चळवळीस वाहून घेतले. पुढे राजाभाऊ खोबरागडे विदेशात स्वखर्चाने शिक्षणासाठी गेले व बॅरिस्टर ची पदवी घेऊन भारतात परत आले. तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांना आपले मानसपुत्र मानून आपल्या चळवळीची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली. बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेत दलीत, शोषित, वंचित लोकांच्या हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून संसदेत आवाज उठविला. पुढे ते राज्यसभेचे उपसभापतीहि झाले. शिका-संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या मुलमंत्रानुसार बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांनी केवळ राजकीय आंदोलनच उभारले नाही तर पूर्व विदर्भातील दलित- मागास व आदिवासी समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून पूर्व विदर्भात शैक्षणिक संस्था उभारून शोषित-वंचित-मागास घटकाला ज्ञानाची दालने राजाभाऊ च्या प्रेरणेने उघडण्यात आली.
२०२५ हे वर्ष राजाभाऊ खोबरागडे यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यांनी केलेल्या सर्वांगीण कार्याचा व शैक्षणिक योगदानाचा प्रचार व प्रसार विद्यापीठ परिक्षेत्रातील विध्यार्थ्यांना व जनतेला व्हावा म्हणून डॉ. मिलिंद भगत यांनी सदर ठराव मांडला कि, ज्यामुळे राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठा मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र व स्मृतिशेष राजाभाऊ खोबरागडे यांनी स्थापन केलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात यावे व बॅरि. राजाभाऊ खोबरागडे अध्यासन केंद्राची विध्यापिठा मध्ये स्थापना करून त्यांच्या कार्य स्मृतीस उजाळा देण्यात यावा. असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याबद्दल मान. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे व सर्व सिनेट सदस्य यांचे आभार मानले.

