कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
मुस्लिम समाजाचे प्रसारक मोहम्मद पैगम्बर सल्लल्लाहु अलैहिवसल्लम यांच्या मदीना शरीफ व अल्लाहचे घर काबा हे इस्लामचे सर्वात पवित्र स्थळ आहे.
अरबी भाषेतील काबा या शब्दाचा अर्थ ‘घन’ असा होतो.
काबा ही सौदी अरेबियाच्या मक्का शहरात स्थित मस्जिद अल-हरमच्या मध्यभागी बांधलेली एक घन इमारत आहे.
काबाला पवित्र बैत अल्लाह (ईश्वरचा घर) असेही म्हणतात.
काबाला किब्ला असेही म्हणले जाते.
किब्ला म्हणजे जगभरातील मुस्लिमांसाठी प्रार्थनेची दिशा आहे.
नमाज दरम्यान, सर्व जगातील मुस्लिम काबाकडे तोंड करून नमाज़ (प्रार्थना) करतात.
येथे हज्जे उमराह करायला संपूर्ण जगातुन 1 करोड़ 30 लाख महिला पुरुष दर वर्षी जात असतात.
असातच सिंदेवाही येथील बाजार चौकात आपली लहानसी मनहारी ची दुकान घेऊन बसणारे सईद दराज हे सौदी अरब येथे मक्का मदीना येथे उमराह ला जात आहेत सिंदेवाही मुस्लिम जमात तर्फे सईद दराज यांना शाल व पुष्पगुच्छ शुभेच्छा देण्यात आले.

