प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व अंतर्गत तालुका शाखा मुल व पोभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम शाखा चक घोसरी येथे दिनांक 11/ 12/ 1/2025 ला बुद्ध विहार चक घोसरी येथे दोन दिवशिय समता सैनिक दलाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन डॉ. राजपाल खोब्रागडे अध्यक्ष व विजयाताई रामटेके अध्यक्ष महिला यांनी केले तर शिबिराचे अध्यक्ष आद अशोक रामटेके अध्यक्ष मुल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आद लोमेश खोब्रागडे सरचिटणीस आद. घनश्याम भडके कोषाध्यक्ष आद संदिप निमसरकर अध्यक्ष पोभुर्णा, आद संजय गेडाम उपाध्यक्ष सवरक्षण आद विजय दुर्गे जिल्हा सचिव आद सरला रंगारी उपाध्यक्ष आद उषा दुर्गे सरचिटणीस आद जि एम बाबोळे अध्यक्ष शहर शाखा मुल, आद प्रकाश तायवाडे सरचिटणीस आद शाम गेडाम सचिव संस्कार आद संदेश डोंगरे सचिव आद. अनिल उराडे नलेश्वर आद लिना उराडे आद दुशिलाताई उराडे उपस्थित होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून आद अनिल मेश्राम उपाध्यक्ष तथा मेजर केंद्रीय शिक्षक आद सहदेव रामटेके माझी सैनिक उपस्थित होते.
डॉ. राजपाल खोब्रागडे अध्यक्ष व विजया रामटेके अध्यक्ष यांनी ध्वजारोहण केले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उपस्थित पाहुण्यांनी आदर्शाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली, मुख्य प्रशिक्षक आद अनिल मेश्राम मेजर व सहदेव रामटेके माझी सैनिक यांनी 45 प्रशिक्षणार्थी ला दोन दिवस प्रशिक्षण देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
समता सैनिक दलाचे शिबिर यशस्वी करण्यासाठी आद संदिप निमसरकर तालुका अध्यक्ष आद संदेश डोंगरे तालुका सचिव यांनी प्रयत्न केले.

