सिंदेवाही तालुक्यातंर्गत मौजा चारगाव (बगडे) येथील समिश्र भजन मंडळाचे कलावंत सातत्याने करतात समाज प्रबोधनाचे कार्य

0
57

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत सिंदेवाही तालुक्यातील मौजा चारगाव (बगडे) येथील समिश्र भजन मंडळाचे कलावंत मागील २० वर्षांपासून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करीत आहेत.
या भजन मंडळाचे पदाधिकारी व सदस्या,सदस्य तथागत भगवान गौतम बुद्ध, युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,वैराग्य मुर्ती संत शिरोमणी गाडगेबाबा,आणि इतर संत महापुरुषांच्या जीवन कार्याला अनुसरून समाज प्रबोधनाचे कार्य करतात.
याचबरोबर ते समाज प्रबोधनाचे माध्यमातून विविध सामाजिक,सांस्कृतिक,भावगीत सादर करीत असतात.
त्यांच्या गितगायनातंर्गत समाजप्रबोधनाने अनेक गावांतील महिला भगिनींचे आणि पुरुष बांधवांचे मने परिवर्तनशिल झाले असून सदर महिला भगिनीं व पुरुष बांधव आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालवित आहेत.
श्रमिक भजन मंडळाचे कलावंत आपल्या विविध गित गायनातून उत्तम समाज प्रबोधन करीत असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक अनेक ठिकाणी होत आहे.
मौजा चारगाव (बगडे) येथील समिश्र भजन मंडळाचे अध्यक्ष सुनील मोहुर्ले,उपाध्यक्ष मनोज खोब्रागडे आहेत तर सचिव सुभाष गजभिये आहेत.
सदस्यांमध्ये सिध्दार्थ खोब्रागडे, कैलास शेंडे, गोपिचंद गजभिये, श्रावण गजभिये,पुष्पा गजभिये,वच्छला गजभिये,विद्या गोटेफोडे,शिल्पा गजभिये,करुणा गजभिये,फुलाबाई गजभिये, इंदिरा खोब्रागडे, सवीता गजभिये, वर्षा गजभिये,सपना गजभिये, सुमीत्रा चांदेकर,आशा गजभिये, अल्का गणवीर,अरुण गणवीर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here