बक्षिसरुपात मिळालेले 1,00,000 रुपये अनाथालयाला मदत:-धावपटू सिकंदर तडाखे.
जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा वरखेडा गावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय धावपटू, विजाक नेव्ही फुलमॅरेथॉन,वसई विरार मॅरेथॉन,पाटणा मॅरेथॉन साउथ एशियन स्पर्धा बांगलादेश 2025 ची 9 वी राष्ट्रीय 13 वी राज्यस्तरीय मराठा विद्या प्रसारक संस्थेची 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन स्पर्धेत 2 रा क्रमांक मिळवणारे सिकंदर तडाखे तसेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी हिरामण ब्राह्मणे याने 17 वर्षाखालील 5 कि.मी स्पर्धेत 1 ला क्रमांक मिळून 5,000 रुपये पारितोषिक मिळवले,महाराष्ट्र योगाभ्यास स्पर्धेतील विजेते वसंतराव उफाडे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत पारीतोषिक मिळवले, विद्यालयातील इयत्ता 10 वी तील अनिकेत गोविंद पवार यांने 17 वर्षाखालील मॅरेथॉन स्पर्धेत 8 वा क्रमांक मिळवला.वरील खेळाडूंचा विद्यालय परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी प्रकाश नाना भुसाळ सदस्य नंदू काळोगे,रामेश्वर मंदिराचे मठाधिपती शिवानंद महाराज,माधवराव उफाडे,रमेश राजगुरू (राकाशेठ),अमोल मातेरे प्रकाश गवळी कांता देव,जगदीश वडजे,मुख्याध्यापक नितीन भामरे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात,माजी पर्यवेक्षक सुनील पाटील या सर्वांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन भामरे यांनी केले.तर धावपटू सिकंदर भाऊ तडाखे यांचा अल्पपरिचय क्रीडा शिक्षक सुभाष मालसाने सर यांनी करून दिला.
याप्रसंगी उपस्थित झालेले वरखेडा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात सर आणि माजी पर्यवेक्षक श्री.सुनील पाटील सर यांचाही शालेय समितीतर्फे सत्कार करण्यात आला.योग गुरु वसंतराव उफाडे यांना योगेश्वर भगवान आणि हनुमानाची प्रतिमा, हनुमान गदा शिवानंद महाराज, माधवराव उफाडे,रमेश राजगुरू यांच्याकडून भेट देण्यात आली. “वरखेडा विद्यालयाच्या प्रेरणेनेच आज मी येथे उभा आहे माजी विद्यार्थी म्हणून नेहमीच मला अभिमान वाटतो. विद्यालयाबरोबर गावाचे नाव उज्वल व्हावे हाच माझा मुख्य उद्देश आहे असे धावपटू सिकंदर तडाखे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. धावपटू सिकंदर तडाखे,वसंत उफाडे,हिरामण ब्राह्मणे अनिकेत पवार अशा खेळाडूंचा वरखेडा गावाला सार्थ अभिमान आहे असे शालेय, समितीचे अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ आणि नंदू भाऊ काळोगे यांनी आपल्या मनोगतातून संयुक्तपणे सांगितले.खेळाडू नेहमीच प्रेरणादायी असतात त्यांचा सत्कार झाल्याने त्यांना नवी प्रेरणा मिळेल असे माजी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक नरेंद्र वड यांनी तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन भामरे सर यांनी मानले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला…

