सर्व शासकिय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्थाकडे पत्रकारांची यादी असायला हवी.-ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे

0
60

“लोकोपयोगी योजनांची माहिती आणि प्रसिद्धीजोग्या कार्यालयीन वृत्ताच्या बातम्याची प्रेसनोट पत्रकारांना मिळायला हवी.”

शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम : वरकरणी पत्रकारांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटल्या जाते. पत्रकार हे स्वतःच्या घरादारावर-कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून,ऊन-पाऊस-वारा किंवा रात्र-दिवस न पहाता,स्वतःच्या जीवावर उदार होऊन संकटाशी दोन हात करीत समाजासाठी आणि देशासाठी झटत असतात.पत्रकारिता हा आमचा व्यवसाय नसून समाजसेवेचा व्यासंग असतो.दुःखी व शोषीत समाजाच्या डोळ्यातील अश्रू टिपून आपल्या लेखनीद्वारे त्याला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतो. शासन आणि जनतेचा दुवा बनून पत्रकार निःस्वार्थ सेवा करीत असतो.दगडालाही देवत्व प्राप्त करून देण्याची किमया केवळ एका पत्रकारामध्येच असते.असे व्यक्त होतांना महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी सांगीतले की,आधुनिक विज्ञान युगात वावरणाऱ्या आजच्या समाजाला आणि दस्तुरखुद्द शासनाला पत्रकारांबद्दल असावी तेवढी आस्था किंवा पत्रकारांच्या निःस्वार्थ सेवेचे मोल नसल्याचे दुःख वाटते.शासनमान्य वृत्तपत्राची पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येक पत्रकारांची नोंद स्थानिक मंत्री-खासदार-आमदार, शासनाची कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती,शैक्षणिक संस्था इत्यादी सर्वांकडेच असायला हवी.आणि सर्वच संस्थांनी शासनाच्या लोकोपयोगी विविध योजनांची माहिती आणि कार्यालयीन कार्यक्रमाची प्रेसनोट लिखीत स्वरूपात प्रत्येक पत्रकारांना देवून त्यांचा सन्मान त्यांना द्यायला हवा.तरच लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचे महत्व अबाधित राहील असे सुद्धा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here