श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

0
92

नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे – श्री. क्षेत्र माहूर गडावरील श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर यांच्या वतीने दिनांक 19/2025 ते दि 25/1/2025 पर्यंत दररोज दुपारी 12ते 4 वाजेपर्यंत भागवताचार्य श्री श्रीराम महाराज चिखलीकर तालुका मानोरा जिल्हा वाशिम यांचे सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या आयोजकांनी केले आहे

माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान चे महंत श्री श्री 1008 परमहंस परीवाज्रकाचार्य महंत मधुसूदन भारती महाराज गुरु अच्युत भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर यांच्या वतीने प्रत्येक वेळी श्रीमद् भागवत कथाचे आयोजन करून भाविक भक्तांना अन्नदानासोबतच धार्मिक तथागडावरील देवदेवतांचे माहिती देण्यात येते या श्रीमद् भागवत कथा सप्ताहात भागवताचार्य अनाम कबीरपंथी ह भ प श्रीराम महाराज चिखलीकर यांचे कथाकथन होणार असून दि 25 रोजी 6.30 वा जगप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा कार्यक्रम होणार आहे तसेच दि 26 रोजी श्री स्वामी अन्नछत्र मंडळ येथे आमदार भीमराव केराम यांच्याकडून महाप्रसाद ठेवण्यात आला असून याच दिवशी दहीहंडीचा कार्यक्रमा सोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे दि 26 रोजी सकाळी अकरा वाजता ह भ प ज्ञानेश्वर भारती महाराज बाळू महाराज काकांनी यांचे काल्याचे किर्तन होईल श्री गुरुचरित्र सप्ताह देवकुमार देशपांडे माहुरकर यांच्या सुमधुर वाणीतून होणार असून या कार्यक्रमात वासुदेव भारती महाराज योगेश्वर भारती महाराज बालयोगी व्यंकटेश स्वामी महाराज पुजारी भवानीदास रेणुकादास भोपी श्री रेणुका देवी संस्थान माहूर तसेच भागवत सप्ताहाचे यजमान म्हणून मधुकर रावजी टेकाळे तसेच रत्नमाला मधुकर टेकाळे हे राहणार असून राजकुमार भोपी अरुण उपलेंचवार संजय कान्नव अनुदीप कोरटकर विजय बेहरे रणजीत तेलेवार यांचे सह या भागवत कार्यक्रमास विलास बालाजी मुलगीलवार वडसेकर यांचे सहकार्य लाभणार आहे अशी माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ श्रीक्षेत्र माहूर यांच्याकडून देण्यात आली असून भाविकांनी या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here