आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी ५० युवकांची तुकडी कोचीन ला रवाना

0
53

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- दि.18:: नेहरू युवा केन्द्र युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार व केंद्रीय रिजर्व पोलिस दल यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ५० आदिवासी युवकांची तुकडी कोचीन (केरळ) येथे होणाऱ्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी आज रवाना करण्यात आली.
खासदार डॉ. नामदेव किरसान व केंद्रीय रिजर्व पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा यांनी कोचीन कडे प्रस्थान करण्याऱ्या युवकांना हिरवी झेंडी दाखवूव रवाना केले.

डेप्युटी कमांडंट सुमित वर्मा, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, सुनील चडगुलवार, रुपेश टिकले, गौरव येणप्रेड्डीवार, अनुप कोहळे यावेळी उपस्थित होते.

खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी युवकांशी संवाद साधताना आपण महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहात त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार केंद्रीय पोलीस दलाचे पोलिस निरीक्षक अनंत जगदाळे यांनी मानले.

ह्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी आणि भामरागड ह्या तीन तालुक्यातील ४५० युवा भारतातील ९ वेगवेगळ्या शहरांना भेट देणार आहेत. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे आणि त्यांना विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे, त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे आणि आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे, पॅनल चर्चा, व्याख्यान सत्र, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी, महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here