किनवट प्रतिनिधी अनिल बंगाळे – किनवट येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील पवार, कार्याध्यक्ष बबन वानखेडे तर स्वागताध्यक्षपदी सचिन कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव पारंपारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत असा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सावजनिक शिवजन्मोत्सवाची बैठक दि.१३ जानेवारी रोजी गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी बैठकीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात सर्वानुमते शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी विक्रम पवार, कार्याध्यक्ष बबन वानखेडे तर स्वागताध्यक्षपदी सचिन कदम उपाध्यक्ष ओम काकडे, पांडुरंग बादड, अरविंद कदम, आदित्य कदम, कोषाध्यक्ष निरंजन मिराशे प्रसिद्धी प्रमुख आकाश इंगोले तर कार्यकारणी सदस्य म्हणून रवींद्र केसरे भुजंग चव्हाण, अरुण दिवसे, अरविंद सूर्यवंशी, प्रकाश गोरे, रितेश मंत्री, अवधूत कदम, प्रदीप कोल्हे, गोविंद आरसोड, कृष्णा मुंगल, सारंग पवार, कृष्णा सोमवंशी, लकी पवार, अमोल सोमवंशी, सोपान शिंदे, महेश दिवसे, राज कानवटे, रोहित केसरे, यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रा. रामप्रसाद तौर, वैजनाथ करपुडे पाटील, अनिल पाटील कराळे, जेष्ठ पत्रकार फुलाजी गरड पाटील मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. दगडू भरकड प्रवक्ते प्रा. शिवदास बोकडे, श्यामराव फाळके, श्री. भदाणे, ज्ञानेश्वर कदम, गंगाधर सोळंके, राजू शिंदे, राजेश कदम, संदीप कोल्हे, सुशील कदम संजय पवार यांच्यासह समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी बांधव उपस्थित होते.

