prabodhini news logo
Home ठळक बातम्या तिर्री (मिन्सी) येथे दोन दिवसीय नागदिवाळी महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

तिर्री (मिन्सी) येथे दोन दिवसीय नागदिवाळी महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

0
511

समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी राष्टीय युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांचे समाज प्रबोधन

जयेंद्र चव्हाण
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
मो.9665175674

भंडारा – पवनी तालुक्यातील अड्याळ पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिर्री ( मिन्सी ) येथील आदिवासी माना जमात कृती समिती,संपूर्ण माना जमात यांचे वतीने आणि माना जमात कर्मचारी वर्ग यांचे सहकार्याने आयोजित विरांगणा मुग्धाई सभागृहाच्या भव्य दिव्य अशा प्रांगणात नागदिवाळी महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दोन दिवसीय नागदिवाळी महोत्सव सोहळ्याचे निमित्ताने संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी आणि कार्यांनी प्रेरित होऊन आदिवासी माना जमात कृती समितीच्या वतीने 18 जानेवारी (शनिवार ) ला संपूर्ण गावाची ग्राम स्वच्छता करून सजावट करण्यात आली.त्यानंतर रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

दि. 19 जानेवारी 2025 रोजी सर्वप्रथम आदिवासी नृत्य सादर करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली. तिर्री येथील रहिवासी नरेंद्र श्रीरामे आणि परिवार यांचे हस्ते खनपूजा व मुठपूजा करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.प्रा.बंडू चौधरी यांचे हस्ते सहउदघाटक उमराव रणदिवे यांचे प्रमुख उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव घोरमारे तर उपाध्यक्ष म्हणून डोमा डडेमल उपस्थित होते.ह्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशोक रणदिवे,सरपंच सुरेंद्र आयतुलवार,नैनाताई चौधरी,खोमाताई राणे,डिलेश्वरीताई ढोणे,पंढरी मडावी,नितेश डडेमल, नरेंद्र आयतुलवार, चिंतामन कुंभरे, रमेश शांतलवार,यादोराव रणदिवे, गणेश आयतुलवार, विनोद डडेमल,मनोज राणे, पुरुषोत्तम गळमळे,पोलीस पाटील पितांबर गळमळे,श्रेयश चौधरी,राजू सांदेवार,पोलीस पाटील रामचंद्र नळपते,प्रदीप घोडमारे,अशोक वरकडे,विलास कुंभरे,विलास डडेमल,रघुनाथ डडेमल आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.प्रथम मान्यवरांचे स्वागत गिताने व पुष्पगुच्च देऊन स्वागत करण्यात आले.ह्यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.रात्री राष्ट्रीय युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी आणि संच नागपूर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.कार्यक्रमाला माना आदिवासी जमातीचे सर्व समाज बांधव तसेच तिर्री ग्रामवासी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील तथा माना आदिवासी जमात कृती समितीचे सदस्य पितांबर गळमळे यांनी केले.संचालन एकनाथ राणे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम गळमळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माना आदिवासी जमात कृती समितीचे अध्यक्ष विनोद डडेमल,उपाध्यक्ष प्रदीप घोडमारे,सचिव महेंद्र घरत, सहसचिव चेतन डडेमल त्याचप्रमाणे माना आदिवासी जमात कृती समितीचे सर्व सदस्यगण यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here