प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व अंतर्गत तालुका शाखा चिमुर येथे भारतीय बौध्दमाहासभा तालुका शाखा चिमुरच्या वतिने धम्म कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , तालुका कार्यकारिणी गठित व जेष्ठ समाजसेवकाचा सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक १८/१/२०२५ ला लुबिनी बुद्ध चिमुर येथे आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाचे अध्यक्ष आद लहुजी पाटील हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक आद डॉ राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व यांनी केले तर मुख्य मार्गदर्शक आद तुलाराम राऊत केंद्रीय शिक्षिक आद लोमेश खोब्रागडे सरचिटणीस तथा केंद्रीय शिक्षक तर मुख्य अतिथी आद शिरीश घोनमोडे, आद जनार्दन खोब्रागडे,आद ऍड संजिवनी सातरडे, आद सोनाली गजभिये जिल्हा संघटक तर प्रमुख पाहुणे म्हणून आद घनश्याम भडके कोषाध्यक्ष आद पद्माकर नारनवरे जिल्हा संघटक आद मनसराम साहरे जिल्हा सचिव, आद अंबादास कोसे तालुका अध्यक्ष, आद जि एम बाबोळे शहर अध्यक्ष मुल आद प्रा गौतम डांगे जिल्हा सरचिटणीस गडचिरोली उपस्थित होते.
सर्व प्रथम आदर्शाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली नंतर डॉ राजपाल खोब्रागडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करुन उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
आद तुलाराम राऊत, आद लोमेश खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले तर मुख्य अतिथी आद शिरीश घोनमोडे, आद जनार्दन खोब्रागडे, प्रा गौतम डांगे यांची मार्गदर्शन झाली नंतर डॉ राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व यांनी जुनी तालुका कार्यकारिणी बरखास्त झाल्याचे जाहीर करून नवीन तालुका कार्यकारिणी घोषित केले व ३५ जेष्ठ समाजसेवकाचा सत्कार करण्यात आला सत्कार नतर डॉ. राजपाल खोब्रागडे यांनी उद्घाटनीय मार्गदर्शनातून उपस्थितांना जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या चोवीस प्रकारच्या शिबिरांची माहिती दिली व नविन कार्यकारिणीने ग्राम शाखा गठीत करावे व चोवीस प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असे सांगितले.
तालुका अध्यक्ष म्हणून आद शिवराम जी मेश्राम पुरुष विभाग , महिला विभागाच्या तालुका अध्यक्षा म्हणून आद ऍड संजिवनी सातरडे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद नथ्थुजी रामटेके तालुका सरचिटणीस यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आद शिवराम जी मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार आद पितांबर खोब्रागडे यांनी मानले सरनतय घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

