लॉयडस् काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आलदंडीत आरोग्य शिबिर.

0
71

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : तालुक्यातील आलदंडी येथे लॉयडस् काली अम्माल मेमोरियल हॉस्पीटल तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि.19) आणि सोमवार (दि.20) सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन आलदंडी पोलीस स्टेशनसमोरील प्रांगणात करण्यात आले.

या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी, चष्मे बनविणे, त्वचा विकाराची तपासणी आणि वैद्यकीय सल्ले, हाडांच्या विकारावर तपासणीसाठी तज्ज्ञांचा सल्ला, कान, नाक व घसा तपासणी करुन तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, मुले व महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

लॉयड्स मेटल्स कंपनीचे डायरेक्टर व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिराचे उद्घाटन लॉयड्सचे अधिकारीगण भास्कर, साई कुमार, अरुण रावत, ले. कर्नल (नि) विक्रम मेहता, सुनिता मेहता, बलराम सोमनानी, रोहित तोम्बर्लावार, संजय चांगलानी, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, महेश मट्टामी पाटील (आलदंडी), उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम (एटापल्ली), पीएसआय कुंभारे (आलदंडी), माजी पं.स.सभापती जनार्दन नल्लावार (एटापल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here