किनवट प्रतिनिधी अनिल बंगाळे – गोकुंद्याहून किनवटच्या रेल्वे स्थानकाकडे प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जाणार्या आँटोरिक्षाची आणि मोटारसायकल क्र.एम.एच.१६-पी.६८९७ ची धडक होऊन गोकुंदा येथिल रहिवासी तथा पंचायत समितीतील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी साहेबराव गंगाराम बटूर (वय वर्ष ६०) हे जागीच मृत्यू पावले. तर आँटो चालकासह अन्य दोन प्रवासीसुद्धा जखमी झाले असल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी तातडीने आदिलाबाद येथे पाठविण्यात आले. सदरील घटना ही आज (२२ जानेवारी) सकाळी ८.४० वाजताचे दरम्यान खरबीफाटा राष्ट्रीय महामार्गावर घडली.
आदिलाबादहून नांदेडकडे जाणारी सकाळची इंटरसीटी एक्सप्रेस रेल्वेला प्रवासी घेऊन जाणारा आँटोरीक्षाची आणि मोटारसायकलची किनवट ते गोकुंदा जाणार्या मार्गावरील खरबीफाट्यावरच भयानक धडक झाली. त्यात गोकुंदा येथिल साहेबराव बटूर (सेवानिवृत्त विस्तार अधिकारी) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकल चालक अहेमद शेख कमाल खान सुभाषनगर किनवट, आँटोचालक संजय अशोक पवार बोरवाडी माहूर, विलास रामलू वासुळके गोकुंदा हे गंभीर जखमी असल्याने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना आदिलाबादकडे पाठवण्यात आले.
मयत बटूर यांच्या पार्थीवावर २३ रोजी अंत्यविधी पार पडणार असल्याचे समजते. मुळात वाळू वाहतूक करणार्या आँटोरिक्षांचा उच्छाद लोकांसाठी जीवघेणा ठरण्याची दाट शक्यतेची या अपघातातर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. संबंधित यंत्रणा किती काळ बघ्याची भूमिका बजावणार असा लोकांचा सवाल आहे.

