भगवानपुर येथे मंडईनिमित्त “पिंजरा” नाट्यप्रयोगाचे यशस्वी सादरीकरण

0
61

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नाटकाचे उद्घाटन संपन्न

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी – तालुक्यातील भगवानपुर येथे नवतरुण नाट्य कला मंडळ भगवानपुर यांच्या सौजन्याने “पिंजरा” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले. या नाट्यप्रयोगाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अमित कन्नाके ब्रह्मपुरी,यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष. उमेश धोटे सरपंच चौगान,वकार खान सामाजिक कार्यकर्ता ब्रम्हपुरी, या कार्यक्रमाचे, प्रमुख पाहुणे मणुन .सेमस्कर वनविभाग ब्रम्हपुरी,बोरचाटे वनविभाग ब्रम्हपुरी, निशा मडावी सरपंच चोरटी,सुधाकर कामडी उपसरपंच चोरटी, प्रकाश नन्नवरे मा.पं.स.ब्रम्हपुरी,राजु राऊत ग्रा.प.सदस्य, शालीक नन्नावरे ग्रा.प.सदस्य,मोरेश्वर उईके, राजेश खरकाटे शाळा व्यवस्थापक, कालेश्वर रामटेके,दिनेश टाकलाय,येशवंत मैश्राम, दामु मैश्राम,किशोर राऊत,अन्य मान्यवरांचीही उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी प्रमोद चिमूरकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “मंडई ही आपल्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही लोककला आणि परंपरा जतन करणे आपले कर्तव्य आहे. अशा नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या कलागुणांना चालना मिळते. ‘पिंजरा’ हे नाटक केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला विचार करायला लावणारा संदेश देते. या उपक्रमातून समाजातील एकात्मता वृद्धिंगत होते आणि कलेला नवीन दिशा मिळते. आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा, ज्यामुळे आपली संस्कृती अधिक संपन्न होईल.”

मंडईनिमित्त आयोजित “पिंजरा” या नाटकाचा भगवानपुर तील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. या यशस्वी आयोजनासाठी नवतरुण नाट्य कला मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here