औंध येथे हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

0
142

पुणे प्रतिनीधी लक्ष्मण कांबळे- गुरुवार दि.23 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत डी. पी.रोड औंध येथे मकर संक्रातीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम पार पडला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वनवर्धिनी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा अंकीता विजय ढोणे, स्नेहा अमोल ओव्हाळ, अर्चना सागर साळुंके आणि सहकारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन अर्चना मिलिंद कदम, अक्षदा रोहित म्हस्के, गौरी रंजीत लोखंडे व सहकारी महिलांनी केले होते.यावेळी अंगणवाडी सेविका भारतीताई जगताप,लता धायगुडे, निवेदिता वाघमारे यांनी बेटी बचाओ -बेटी पढाओ शपथ देऊन जनजागृती केली. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here