लोकहो, अंधश्रद्धेला बळी पडू नका – प्राचार्य राहुल डोंगरे

0
141

चिखला माईन्स येथे प्रतिपादन

गोबरवाही पोलीस स्टेशनचा स्तुतीजन्य उपक्रम

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – जादूटोणा, भूत – भानामती , करणी , मंत्र – तंत्र, चेटूक ,चमत्कार ,देवी अंगात येणे, ज्योतिष्य, बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत .या प्रकारांना अशिक्षिताप्रमाणे सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात .यातून समाजात, गावागावात भांडणे निर्माण होऊन एखाद्याच्या बळी घेतला जातो .अशा घटना घडू नयेत यासाठी लोकहो, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा. अंधश्रद्धेला बळी पडू नका. घटनेची चिकित्सा करा असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर चे तालुका संघटक, प्रसिद्ध वक्ते प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले .ते चिखला माईन्स येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार – प्रसार समाज प्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शरद शेवाळे (पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गोबरवाही) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका सचिव संजय केवट, करुणा कोकोडे (सरपंच),लोकराम सोनवाणे (पोलीस पाटील),नीतू मडावी (माजी सरपंच) आदी उपस्थित

प्राचार्य राहुल डोंगरे पुढे म्हणाले की, शकुन व नवस, गंडेदोरे, ताईत ,ग्रहांचे खडे, मंत्र तंत्र, यांना सत्तेचा आधार नाही. ज्योतिष्य, हस्तरेखा शास्त्र ,विज्ञान नाही. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. त्याचे निर्मूलन कसे करता येईल याकरिता प्राचार्य राहुल डोंगरे यांनी वैज्ञानिक प्रयोगातून अग्नी प्रज्वलित केले .कानाने चिठ्ठी वरील नावे वाचून दाखवले, जळते कापूर भक्षण करून दाखवले, लिंबूतून केस काढून दाखविले. तांदूळ भरलेला तांबे उचलून वर उचलून दाखवले वैज्ञानिक प्रयोगातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. जादुटोणा विरोधी कायदा सुद्धा प्राचार्य राहुल डोंगरे यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितला.भंडारा जिल्ह्याचे आय.पी.एस. पोलीस अधीक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , पांडुरंग गोफणे उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस निरीक्षक शरद शेवाळे,यांनी या उपक्रमाला चालना दिल्यामुळे अनेकांचे गैरसमज दूर होतील व कोणीही भोंदू बाबांना बळी पडणार नाही व गावागावात शांतता प्रस्थापित होईल. वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होऊन आदर्श पिढी तयार होण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी संकल्प केला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शेवाळे (पोलीस निरीक्षक) यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन विजय केवट यांनी केले. तर आभार मंगेश पेंदाम (पोलीस हवालदार) यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी सपाटे, नेपाल गभने (पोलीस अंमलदार),नितीन राठोड, शद्धेश्वर शेळके,अब्दुल मुजीफ,उषा टेंभूर्णे, रूपा उके ,रेखा गंगोबोई,संगीता कळवडे,रामदुकारी सोनकल्यारी,शिल्पा टेंभूर्णे,पल्लवी धावडे, पायल धावडे,आशिष धुर्वे,प्यारे नरसिंग आदींनी मोलाचे सहकार्य केले.जनतेकडून पोलीस विभागातर्फे आयोजित या उपक्रमाची स्तुती होत आहे.सृजनशील समाज घडविण्यासाठी उचललेले हे एक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here