ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज -दि. २६ भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ वा वर्धापन दिनानिमित्त आज, जिल्हा परिषदच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत तसेच प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्यात आला.
राज्यगीत व ध्वजगीत सादरीकरण करून वातावरण प्रसन्न झाले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भारताचे संविधान प्रास्ताविका वाचन केले, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे तंबाखू मुक्तीची शपथ देखील घेण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व वाहनचालक कर्मचारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचारी वर्गास प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख संदिप चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल, बांधकाम विभाग प्रमुख संदिप चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, लघुपाट बंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी-कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

