वाकेश्वर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यांचा अनावरण सोहळा
भंडारा तालुक्यातील वाकेश्वर येथील रावणवाडी रोडवरील पंधरा कुटुंब असलेल्या छोट्याशा वस्तीतील ज्येष्ठ नागरिक,तरुण मंडळी व महिलांच्या सहभागाने नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नेताजीच्या पुतळ्याची स्थापना व भव्य असा कार्यक्रम करून गावासमोर एक आदर्श निर्माण केला.
पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुभाष आजबले माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष समाज सुधार सहकारी पतसंस्था वाकेश्वर तर सहउद्घाटक गोवर्धनजी वैद्य माजी पंचायत समिती सदस्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरज गोंडाणे , उपाध्यक्ष समाजसुधार सहकारी पतसंस्था वाकेश्वर तर प्रमुख अतिथीमध्ये पं . स . सदस्या सिमाताई रामटेके , श्रीरामजी मुटकुरे , माजी सैनिक दर्यावजी लेंडारे , उपसरपंचा शालुताई दिघोरे , कैलासभाऊ थोटे , रामभाऊजी डहाके , दाजीबा आंबेकर ‘ तंटामुक्ती अध्यक्ष होमदेव कुथे , शाळा व्य. स . अध्यक्ष संजय हटवार , माजी उपसरपंच पंकज जिभकाटे , लक्ष्मीकांत डहाके देवाभाऊ भेदे , समाजसुधार पतसंस्थेच्या संचालिका माधुरी खरवडे व प्रमिलाताई चोले , पोलीस पाटील नुतनताई मस्के , रितेशजी चोले , व वाकेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी पुतळ्याची जोपासना, सुरक्षितता त्यांचे आचार , विचार आत्मसात करून इतरांना पुतळा स्थापनेतून प्रेरणा कशी देता येईल यावर सखोल मार्गदर्शन याप्रसंगी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले गांधी कनिष्ठ महा . पहेलाचे प्रा . सुरज गोंडाणे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस हे अनेक देशभक्तांचे प्रेरणास्त्रोत होते . त्यांनी देशाला इंग्रजांच्या झुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी ११ वेळा तुरुंगवास भोगला . वेगवेगळ्या देशात जावून त्यांनी अनेक तरुणांमध्ये देशभक्ती रुजविली . असे विचार व्यक्त केलेत व आपला वाकेश्वर गाव हा पंचक्रोशीत मुर्त्यांचा गाव म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे . आता गावातील तरुणांनी एकत्र येऊन या महापुरुषांचे विचार आत्मसात करा . व हे विचार इतरांपर्यंत कसे पोहोचवता येतील यावर चिंतन करा तरच आपला गाव आणि परिसर इतरांसाठी आदर्श ठरेल . गावातील वाचनालयाला मोठं करा . त्यात अनेक पुस्तका भेटस्वरूपात द्या .मुलांना वाचनालयात जायला प्रेरीत करा असे विचार याप्रसंगी व्यक्त केलेत .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अनिल दिघोरे यांनी गावातील जि. प शाळेपासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौकापर्यंतचा परीसर सौंदर्यकरणाबद्दल तसेच वेगवेगळे उभारलेले पुतळे यांच्याबद्दल माहिती सांगितली . यावेळी श्रीनगर येथील मूर्तीकार अमर बावणे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष फागोजी बावनकर उपाध्यक्ष रवींद्र हलमारे, सचिव संजय कुथे, गंगाधर कुथे,ज्ञानेश्वर कुथे, राजेश कुथे, विक्की कुथे, अविनाश कुथे, कुणाल कुथे ,रमेश बावनकर, रणवीर बावनकर, लंकेश मस्के, आशिष भेदे तर महिला सदस्य शालिनी कुथे,शितल कुथे,प्रतिभा बावनकर, सुशीला बावनकर, सुशीला हलमारे, माधुरी कुथे, प्रमिला भेदे, सुनिता बावनकर, रंजना कुथे, मालू मस्के, रूपा .हालमारे,प्रतिभा भेदे ,छाया कुथे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अनिल दिघोरे तर आभार लंकेश मस्के व्यक्त केले.

