खेळाचे गणवेश वितरण करून गणराज्य दिन साजरा
अव्दिक बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
पहेला :- अव्दिक बहुउद्देशीय संस्थेद्वारे जि.प.शाळा खापा (जं) येथे प्रजासत्ताक दिवसी अठरा मुला- मुलींना स्पोर्ट ट्रॅक सूट वितरण करण्यात आले.
सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असणारी अव्दिक बहुउद्देशीय संस्था ही नेहमी ओळखली जाते.खापा(जं) जिल्हा परिषद शाळेची गरज लक्षात घेता संस्थेनी एक महिन्यापूर्वी कार्यक्रमाचे नियोजन करून संस्थेच्या “वाढदिवस एक सामाजिक उपक्रमा” अंतर्गत सदस्य पराग कडव यांच्या वतीने शाळेतील अठरा मुला-मुलींना स्पोर्ट ट्रॅक सूट देण्यात आले.
तसेच शाळेतील प्रथम क्रमांक प्राथमिक मुले कबड्डी, रिले रेस प्राथमिक मुले-मुली, शंभर मीटर धावणे प्राथमिक प्रथम मुले केंद्र वाकेश्वर मधून यांना मेडल व शिल्ड या प्रसंगी देण्यात आले.
या उपक्रमाला गावातील उपसरपंच सूर्यभान सिडाम, पोलीस पाटील गजानन वाढीवे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल कोळवते ग्रा.पं.सदस्य पुजा प्रतेके,प्रियंका सिडाम आशा वर्कर, मुख्याध्यापक जे.आर.पराते,अव्दिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल दिघोरे, कोषाध्यक्ष नारद चोले,सदस्य अजयकुमार चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

