कुरखेडा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज – श्री. साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मालेवडा यांच्या वतीने आज दिनांक 27 जानेवारी रोजी स्नेहसंमेलनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यमान आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी आमदार मसराम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये ओळखून जीवनात नवनवीन संधींचा लाभ घ्यावा.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नृत्य, गीते, नाटिका आणि भाषणे यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहमय झाले. याशिवाय क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाला उपस्थित पि.आर.आकरे, नवनाथ धाबेकर, P.S.I मोरे साहेब, सरपंच मालेवडा अनुसाया पेंदाम,उमेश नंदनवार, माजी सरपंच बाळूजी शेडमाके, रोहिदास उईके, धाबेकर सर, नवखरे मॅडम,डॉ काबळे सर,साजन मेश्राम,उध्दव पेंदाम सुभाष गुंडरे, सर्व उपस्थित मान्यवर व शिक्षक वृंद तथा विद्यार्थी बांधव…
स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला तसेच त्यांच्यात आत्मविश्वास जागृत केला. उपस्थित सर्वांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

