देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – मौजा: एकलपूर, तालुका देसाईगंज येथे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा आदिवासी स्मारक समितीच्या वतीने भव्य बैल शर्यत (शंकरपट) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय आमदार रामदास मसराम उपस्थित होते.
कार्यक्रमात स्थानिक शेतकरी व बैल मालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शंकरपट स्पर्धेत विविध गटांत बैलजोड्यांची चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. माननीय आमदार रामदास मसराम यांनी आपल्या भाषणातून स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले व पारंपरिक शंकरपट स्पर्धा ही आपली ग्रामीण संस्कृती जपणारी असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी विजेत्या बैलजोड्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक मंडळाचे योगदान उल्लेखनीय ठरले.
बैलांच्या जंगी शर्यतीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

